senior citizen forum | gondwanamitra manadl

        Gondwana Senior Citizen Forum Mumbai

     गोंडवाना ज्येष्ठ नागरिक फोरम

    “Senior citizens are asset of our society “ज्येष्ठनागरिकांच्यासवलतीआणिअपेक्षा

 

फोरमचे  ध्येय  

सर्व स्तरातील ज्येष्ठ नागरिक स्त्री पुरुषांना आपले जीवन ,मानाने , सुख समाधानाने ,तसेच आनंदाने जगता यावे म्हणून योग्य जागरुकता निर्माण करून त्याना स्वयंपूर्ण व आत्मनिर्भर होण्यास मदत करणे तसेच ज्येष्ठाचा अनुभव समाजास उपयोगी पडावा यासाठी प्रोत्साहित करणे “ senior citizens are asset of our society “

फोरमचे उद्दिष्टे

  • फोरमच्या सदस्यामध्ये निरनिराळ्या कार्यक्रमाद्वारे एकता ,स्नेहसंवर्धन आणि ज्ञान जिज्ञासा निर्माण करून त्या संघटीत शक्तीचा  उपयोग समाज सेवेसाठी , विशेषता ज्येष्ठ नागरिकाना आपले जीवन ,मानाने , सुख समाधानाने ,तसेच आनंदाने जगण्यास मदत करणे
  • ज्येष्ठ नागरिकासाठी एकता व स्नेहसंवर्धन कार्यक्रम ,आरोग्य शिबीर ,योगवर्ग ,सहली चर्चासत्र ,परिसंवाद ,इत्यादी कार्यक्रमाचे आयोजन करणे ,
  • “ज्येष्ठ नागरिक ओळख पत्र “ काढण्यास मदत करणे
  • ज्येष्ठ नागरिकासाठीच्या शासनाच्या विविध सोयीसवलती ची माहिती करून देणे व , त्याचा  फायदा घेण्यास प्रोत्साहन देणे
  • निवृत्तीनंतरचे आर्थिक नियोजन ,कर नियोजन ,आरोग्य विमा इत्यादी विषयी सल्ला देण्याबाबत सल्लागाराची व्यवस्था करणे

कार्यकारी समिती

  • अध्यक्ष १
  • कार्याध्यक्ष  १
  • सचिव १
  • सहसचिव १
  • कोषाध्यक्ष १
  • सभासद ६

एकूण   :  ११  सभासद

१. गोंडवाना मित्र मंडळाचे  ज्येष्ठ सभासद  ज्यांनी  वार्षिक वर्गणी  नियमितपणे  भरलेली असेल त्यांना आपोआप  सभासदत्व प्राप्त होईल .

२. नवीन ज्येष्ठ सभासद   सभासदांना रुपये  १०००/-  भरून सभासद होता येईल .

Total Page Visits: 1821 - Today Page Visits: 1